बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

मुबंई | बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत नेहमी कोणत्या न कोणत्या तिच्या वक्तव्यामुळे वादात असते. ट्विटरवर ती नेहमी अ‌ॅक्टिव्ह असते. आता कंगणा आणखी एका वक्तव्यामुळं चर्चेत आली आहे. एका ट्विटला उत्तर देताना तिने मोठा खुलासा केला आहे. तिला ग्वाल्हेर लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली होती, असा खुलासा कंगणा राणावतने केला आहे.

माझं ट्विट लक्षात ठेवा… कंगणा राणावत येत्या काळात मंडी लोकसभा मतदारसंघातली पोटनिवडणुकीची तयारी करणार…, एका ट्विटर युझरने ट्विट केलं होतं. याला उत्तर देत, 2019 मध्ये मला ग्वाल्हेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या 70 ते 80 लाख आहे. येथे फार गरीबी आणि गुन्हेगारी नाही. मी राजकारणात आलेच तर, अशा राज्यातून निवडणूक लढेल जिथे जास्त आव्हाने असतील, असं कंगणा म्हणाली.

जर राजकारणात आले तर, माझ्या कष्टानं मी या क्षेत्रात ‘क्वीन’ बनण्याचा प्रयत्न करेल, असं कंगना म्हणाली. तुमच्या सारखे लोक हे समजू शकणार नाही, असा टोलाही तिनं त्या युजरला लगावला आहे. तर आणखी एका ट्विटच्या माध्यामातून तिनं स्वतःला ‘बब्बर शेरनी राजपूताना कंगणा राणावत’ म्हणून घेतलंय.

दरम्यान, मंडीतील लोकसभा खासदार रामस्वरूप शर्मा यांनी नुकतीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्या जागेवर कोण निवडणूक लढावणार यावर चर्चेला उधाण आलं होतं. तर कंगणा ही निवडणूक लढवून लोकसभेत पाऊल ठेवेल, अशी चर्चा रंगला होती. परंतू आता तिने स्वतःच या विषयाला फुल स्टाॅप दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद

मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय

“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”

शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More