बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिने माझं आयुष्य बरबाद केलं’; दिपाली चव्हाणांनी पतीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेली ‘ती’ महिला कोण?

अमरावती | वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी पती राजेश मोहिते यांना एक भावनिक पत्र लिहिलं होतं. या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. या पत्रात दिपाली चव्हाण यांनी एका महिलेच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.

मनिषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी होणार नाही. तिने माझे आयुष्य बरबाद केले आहे, असं पतीला लिहिलेल्या पत्रात आहे. त्यामुळे पत्रात उल्लेख असलेली ‘ती’ महिला कोण? तिचा दीपाली यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, यासारखे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत.

वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. दीपाली यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईट नोट लिहिलेली आहे. यात डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्यानं धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली आहे.

दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने शनिवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, दीपाली यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. शिवकुमार यांचं निलंबन केलं आहे. तर श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत

“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”

‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल

जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More