बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटी आईच ती! आर्यनला कोठडीत घेऊन गेली बर्गर

मुंबई | एनसीबीनं मुंबईत क्रुझवर टाकलेल्या छाप्यात अनेकांना अटक करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही अटकेत आहे. आर्यनच्या अटकेनंतर सगळ्याच क्षेत्रातून पडसाद उमटताना दिसत आहे. सध्या आर्यनला एनसीबी कोठडी सुनावली आहे.

आर्यनला कोठडी सुनावताच त्याला कोठडीत चांगलं जेवन मिळत असेल की नाही या काळजीपोटी त्याची आई गौरी खान त्याला खायला घेऊन गेलेली पहायला मिळाली. गौरी आर्यनसाठी कोठडीत बर्गर घेऊन गेली होती. मात्र एनसीबीनं त्याला बर्गर देण्यास नकार दिला. त्यामुळे आर्यनला कोठडीत मेसचं जेवनच खावं लागणार आहे.

आर्यनची कोठडी आज संपेल. त्यामुळे आज काय सुनावणी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आर्यनसोबत कोठडीत आणखी तीन आरोपींना ठेवण्यात आलं आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, एनसीबीनं मुंबई-गोवा-मुंबई रेव्ह पार्टीत छापा टाकत आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा टाकला आहे. या छाप्यात त्यांनी ड्रग्ज करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. आता त्यांची चौकशी सुरु असून नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

पहाटे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान, 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

पुणे मेट्रोसंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More