बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्महत्या करण्यासाठी तीने आईस्क्रीममध्ये विष मिसळलं, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

तिरुवनंतपुरम | केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील कन्हानगडमध्ये एका 25 वर्षच्या महिलेने आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. महिलेचं नाव वर्षा   आहे या मध्ये तीचा जीव वाचला असून तीच्या मुलाचा आणि बहिणीचा मृत्यू झाला आहे.  मात्र केरळ पोलिसांनी महिलेवर आत्महत्येप्रकरणी तसेच बहीण आणि मुलाच्या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्या करण्यासाठी वर्षाने आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळलं होतं. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ती तीच्या खोलीत गेली मात्र आईस्क्रीम टेबलवरच ठेवून गेली. ते आईस्क्रीम वर्षाचा लहान मुलगा अद्वैतने आणि तीची बहीण दृष्या यांच्या नजरेस पडलं. त्यांनी ते खाल्लं.  आईस्क्रीम संपवल्यानंतर अद्वैत आणि दृश्याने हाॅटेलमधून बिर्याणी मागवली होती. त्याच रात्री काही वेळानंतर अद्वैतला उलट्यांचा त्रास झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. अद्वैतच्या मृत्यूनंतर दृश्या देखील आजारी पडून आठवड्यानंतर तीचासुद्धा मृत्यू झाला. 17 फेब्रुवारीला वर्षाच्या नातेवाईकांनी तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

कन्हानगडमध्ये वर्षा आपल्या आई आणि बहिणीसोबत राहायला आली होती. त्याचदरम्यान तीने आत्महत्येचं मोठ पाऊल उचलं. मात्र विषमिश्रीत आईस्क्रीम खल्यानंतर तीला फारसा त्रास झाला नसल्यामुळे तीने त्याबाबत कोणालाही सांगितलं नव्हतं.  त्यामुळे दोघांचाही मृत्यू बिर्याणीमुळे झाला असल्याचा समज घरतल्यांचा झाला होता.

दरम्यान, वर्षाच्या केेलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र तीच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवध, कलम 305 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

इंदापूर तालुक्यातील जवान लक्ष्मण डोईफोडेंना आसाममध्ये वीरमरण!

मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले, त्यामुळे…- चित्रा वाघ

“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये”

संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह

‘कोरोनापासून बचावासाठी मी रोज…’; ‘या’ भाजप नेत्याचं अजब वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More