बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांना जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये म्हणून ती वाटतेय मोफत ॲाक्सिजन सिलेंडर!

लखनऊ | कोराना महामारीच्या काळात 26 वर्षांची अर्शी लोकांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन जीवदान देत आहे. लोक तिला सिलिंडरच्या नावाने ओळखतात. जेव्हा अर्शीचे वडील कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली, तेव्हा अर्शीला ऑक्सिजन मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यावेळी, ऑक्सिजनमुळे होणाऱ्या अडचणी देखील तिला समजल्या आणि कोरोना रूग्णांच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर पोहोचण्यासाठी तिने आपल्या स्कूटीवर ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यास सुरवात केली. उत्तर प्रदेशच्या शाजापूरच्या मदारखेलमध्ये राहणारी अर्शीने 20 ऑक्सिजन सिलिंडर मोफत वाटले आहेत.

अर्शीच्या वडिलांना एक महिन्याअगोदरचं श्वास घ्यायला त्रास होत होता. आयसोलेशनमध्ये असून देखील त्यांची ऑक्सिजन पातळी खालावत होती. तेव्हा डाॅक्टरांनी अर्शीला ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी सांगितलं. अर्शीने जेव्हा ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तिला असं सांगण्यात आलं की, घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नाही.

उत्तराखंडच्या एक सामाजसेवा करणाऱ्या व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे तिला ऑक्सिजन सिलेंडर मिळालं आणि तिच्या वडिलांचे प्राण वाचले. कोरोना महामारीच्या काळात कोणीचं कोणाची मदत करत नाहीये. मात्र, अर्शीसारखे असे खुप लोकं आहेत ज्यांना माहीतीये की आपण समाजाचं काही देणं लागतो, असे लोकं गरीब लोकांसाठी धावून येतायं.

दरम्यान, अर्शीने उत्तरप्रदेशच्या शाहबाद आणि हारदोई या भागात मोफत ऑक्सिजन सिलेंडर देऊन अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत. ती या कामाचे पैसे घेत नाही.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रजनीकांत आले पुढे, केली इतक्या लाखांची मदत!

टाटांच्या इलेक्ट्रिक कारला देशवासियांची सर्वाधिक पसंती, आता केला ‘हा’ मोठा विक्रम!

वयाच्या 92व्या वर्षी ‘या’ ज्येष्ठ शेतकरी नेत्याने केली कोरोनावर मात

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More