Video | मेस्सीची फॅन भर मैदानात झाली टॉपलेस, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | फिफा वर्ल्डकप (FIFA WORLD CUP) फायनलमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून अर्जेंटिनाने 36 वर्षांनी विजेतेपदावर नाव कोरलं. यामुळे लिओनेल मेस्सीचं स्वप्न पुर्ण झालं. या विजयानंतर मेस्सीच्या जगभरातील चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. या विजयानंतर मेस्सीच्या एका फॅनने मैदानात टॉप काढला.

मेस्सीच्या फॅनने कॅमेऱ्यासमोरच सर्व मर्यादा ओलांडत आनंदाच्या भरात टॉपलेस झाली. संपूर्ण जगाने लाईव्ह ही घटना पाहिली. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

36 वर्षांनी अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आणि यानंतर उत्सावामध्ये बेभान या महिलेने चक्क आपल्या अंगावरील टॉप काढून हवेत फिरवला.

फायनल सामन्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात (fifa World Cup video ) कैद करण्यासाठी तिथे असंख्य कॅमेरे होते. टॉपलेस झालेली ही महिला तिथे असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली.

दरम्यान, या फॅनने केलेलं हे कृत्य तिच्या अंगलट येऊ शकतं. कतारमध्ये याबाबत कठोर नियम असून या फॅनवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More