चंद्रपूर | चंद्रपूरच्या वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल आमटे यांनी आत्महत्या केल्यानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आत्महत्येपूर्वी आमटे कुटुंबातील वाद समोर आला होता.
काय होता हा वाद?
शितल आमटे या डॉ. विकास आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. दि. २० नोव्हेंबर रोजी त्यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. महारोगी सेवा समिती आणि त्यांच्या विश्वस्तांवर त्यांनी काही आरोप केले होते. कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते, त्यानंतर त्यांनी हे फेसबुक लाईव्ह डिलीट केलं होतं.
शितल आमटे यांच्या आरोपांनंतर आमटे कुटुंबाने एक संयुक्त निवेदन काढलं होतं, ज्यामध्ये शितल यांचे आरोप फेटाळून लावण्यात आले होेते. या निवेदनावर शितल यांचे आई-वडील विकास आणि भारती तसेच चुलते प्रकाश आणि चुलती मंदाकिनी यांच्या सह्या होत्या.
शितल यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी म्हटलं होतं. शितल नैराश्याविरोधात लढत होत्या, असंही त्यांनी म्हटलं होतं.
शितल करणार होत्या निवेदन-
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शितल यांनी आमटे कुटुंबावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणही दिलं होतं.
“दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून लवकरच आमची भूमिका जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं, असं शितल यांनी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, 8 गाड्या एकमेकांना धडकल्या
आटपाटीच्या बाजारात विक्रीला आला ‘मोदी बकरा’; किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
“तुमच्या कानाला आणि हृदयाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती केलीये”
शेतकरी आंदोलन मोदी सरकारला जड जाणार?; आता शेतकऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा