मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसाच्या बांग्लादेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणांबरोबरच त्यांनी हिंदू मंदिराला दिलेली भेट आणि पश्चिम बंगाल, आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यावरुन आरोप प्रत्यारोपांमुळे दौरा चांगलाच गाजला. मोदींचा बांगलादेश दौरा हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे, अशी टीका ममता बॅनर्जींनी केली होती. मात्र, ममतांनी ही टीका केल्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीकडे गेलं आहे.
अवामी लीगच्या नेत्या आणि देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांनी शुक्रवारी ढाका विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. बांग्लादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शेख हसीना या मोदींसहीत उपस्थित होत्या. ढाक्यापासून 35 कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या दोन्ही पंतप्रधानांना विशेष मानवंदना देत त्यांचं स्वागत करण्यात आलं.
मोदी आणि शेख हसीना हे सैन्याचं अभिवादन स्वीकारत मंचाकडे एकत्रच चालत गेले. मात्र यावेळी शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीच्या पदराकडे आता भारतीय नेटकऱ्यांचं लक्ष गेलं आहे. शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीचा काठ पदर हा हिरव्या रंगाचा होता त्यावरील नक्षीकाम हे कमळाच्या फुलांचं होतं.
दरम्यान, कमळ हे पंतप्रधान नरेेंद्र मोदी ज्या पक्षाचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्याचं निवडणुक चिन्ह आहे. नेटवर या कमळाची नक्षी असणाऱ्या साडीवरुन सगळीकडे तुफान चर्चा सुरु आहे.
शेख हसीना यांनी कमळ असलेली साडी घातली.
— #पुणेरी_विदर्भपुत्र 🚩🚩 (@mangeshspeaks) March 28, 2021
थोडक्यात बातम्या –
“दुकानं बंद करण्यास अजून एक तास वाढवून देण्यात यावा”
‘बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटलांचा मोदींना टोला
वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं तेव्हाच सांगितलं होतं की…- संजय राऊत
सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?-नारायण राणे
रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.