बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

रायगड | रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा पार पडला. त्यावेळी शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना भाजपवर शरसंधान साधलं. खोपोलीच्या समर्थ मंगल कार्यालयात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप आणि शेकापची विचारसरणी पुर्वीपासूनच वेगळी आहे. पण पुर्वीचे भाजपमधील नेते, कार्यकर्ते हे आपल्या विचारांशी बांधिल होते, असं म्हणत आता भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा आणि कोणतीही ध्येयधोरणे नसलेला पक्ष झाला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजपमधील मुळ निष्ठावंतांची संख्या कमी झाली असून पाट लावून बाहेरून आणलेल्या उपऱ्यांची गर्दी झाल्याचीही टीका करत मोदी सरकार शेतकरीविरोधी असून धनधांगड्यांसाठी सरकार काम करत असल्याचा घणाघात आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

रायगडमध्ये बोलत असताना कोणासोबत युती करायची याबाबत पुर्णपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधून मगच निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करत सध्यातरी जिल्ह्यातील युती किंवा आघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी या मेळाव्यात बोलून दाखवलं. जयंत पाटलांच्या टीकेनंतर आता त्याला भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळणार?, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

राज्यातील कॉलेज उद्यापासून सुरू, मात्र या नियमांचं करावं लागणार पालन, वाचा सविस्तर

“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More