मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी आता बाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची होणार चौकशी

 मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला बाॅलिवूडमधील गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास करताना पोलिसांनी अनेक बाॅलिवूड कलाकारांचा जबाब नोंदवला आहे. आता दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही पोलिस चौकशी करणार असल्याचं समोर आलं आहे.

शेखर यांच्या ‘पाणी’ या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतची निवड झाली. मात्र काही कारणास्तव यशराज फिल्मसोबतचे संबंध बिघडल्याने हा प्रोजेक्ट अडकून पडला. यासाठी हा तपास केला जाणार असल्याची माहिती आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर शेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली होती. यामध्ये शेखर म्हणाले ‘तूला किती त्रास सहन करावा लागत होता, याची कल्पना मला आहे. तुला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडणारे देखील मला चांगलेच माहिती आहेत. कारण माझ्या खांद्यावर डोकं टेकवून तू रडला होतास.’

‘या सहा महिन्यात मी तुझ्यासोबत असतो तर तूला भेटता आलं असतं. पण जे काही घडलं त्यात तुझी चूक नाही’ अशा आशयाची पोस्ट शेखर यांनी केली. यामुळे आता वांद्रे पोलिसांकडून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी शेखर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान तर रिकव्हरी रेट ५२ टक्क्यांवर कायम!

सॅनिटायझर प्यायल्याने नागपुरात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या