Shekhar Suman | हिरामंडी वेबसीरिजमधून प्रसिद्धीस आलेले आणि सध्या चर्चेत असलेले अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) हे सध्या प्रकाशझोतात आहेत. शेखर सुमन (Shekhar Suman) हे अभिनेते असले तरीही ते राजकारणात सक्रिय असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीला त्यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे शेखर सुमनविरोधात निवडणूक लढवत होते. त्यावेळी शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा काँग्रेसविरोधात पराभव झाला. अशातच आता शेखर सुमन (Shekhar Suman) हे एका वक्तव्याने चर्चेत आले आहेत.
काय म्हणाले शेखर सुमन?
एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी राजकारण आणि अभिनय क्षेत्रावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मला आजही एक उत्कृष्ट अभिनेता व्हायचं आहे. हा राजकारणाचा एक भाग आहे. इंडस्ट्रीत राहुन मला काम करता येईल. राजकारणातील चढ-उतारांमध्ये अडकायचं नाही. मी कोणी राजकारणी नाही. राजकारणात येऊन मला काही गोष्टी करायच्या आहेत, असं शेखर सुमन यांनी म्हटलंय.
“तर भाजप सोडेल”
मी सक्षम आहे. मी ध्येयवेडा आहे. माझ्यासमोर ध्येय आहे. ते ध्येय मला योग्य त्या वेळेत पूर्ण करायचं आहे. जर मला हे ध्येय पूर्ण करता आलं नाही तर मी यातून बाहेर पडेल. सेवा करण्यासाठी मी इथे खास आलो आहे. सेवा करण्यास मी असमर्थ राहिलो तर मी इथे थांबण्यास काहीही अर्थ राहणार नाही, असंही ते म्हणालेत.
यावेळी बोलत असताना शेखर सुमन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच देखील कौतुक केलं आहे. एका व्यक्तीने अनेक गोष्टी सरळ केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीय परदेशात जातो. तेव्हा त्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. सध्या देशात विकास होत आहे. यामागे कोणी असतील तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं ते म्हणाले.
अभिनेता शेखर सुमन हिरामंडी या वेबसीरिमुळे चर्चेत आहे. सध्या ते भाजपचे नेते आहे. नरेंद्र मोदींविषयी त्याला खूप कौतुक आहे. तसेच तो सध्या मुंबईमध्ये वास्तव्यास असून गलेलठ्ठ संपत्ती शेखर सुमन यांनी कमाई करून ठेवली आहे.
News Title – Shekhar Suman Big Statement About BJP Party
महत्त्वाच्या बातम्या
सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल
आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी
पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या
या राशीच्या व्यक्तींचा गैरसमजातून वाद वाढू शकतो
बजरंग सोनवणे बीडच्या स्ट्राँगरूममध्ये धडकले, काय घडलं नेमकं?