अभिनेत्री रेखाबाबत शेखर सुमन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Shekhar Suman | अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) हे अनेक कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यासाठी ते नेहमी प्रकाशझोतात असतात. शेखर सुमन (Shekhar Suman) हे हिरामंडी या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत आले आहेत. शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा वेबसीरिजमध्ये अगदी महत्त्वाचा सीन आहे. शेखर सुमन यांनी नवाब झुल्फिकर अहमद ही भूमिका बजावली याची जोरदार चर्चा आहे.

सांगायचं झालं तर एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी देखील तवायफ महिलेची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. अशातच शेखर सुमन यांनी रेखा यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेखर सुमन (Shekhar Suman) चर्चेत आले आहेत.

रेखाबाबत शेखर सुमन यांचं मोठं वक्तव्य

नुकत्याच एका कार्यक्रमात शेखर सुमन यांना अभिनेत्री रेखा यांच्याबाबत विचारलं त्यावर अभिनेते शेखर सुमन यांनी फार महत्त्वाचं विधान केलं आहे. रेखा यांच्याबाबत बोलायचं म्हटलं तर दुसरी मुलाखत घ्यावी लागेल. त्यांच्याबाबत मोजकंच बोलणं म्हणजे त्यांचा अनादर केल्यासारखं आहे. उत्तम अभिनेत्री मग त्यांचा आवाज असो किंवा मग त्यांचं गाणं आणि त्यांची शेरो-शायरी…’ असं शेखर सुमन म्हणालेत.

“…त्यानंतर एका रेखाचा जन्म होतो”

अशा अनेक अभिनेत्री येतात आणि जातातही. मात्र त्यानंतर एका रेखाचा जन्म होतो. प्रचंड कौशल्य, सुंदर, प्रेमळ…असं शेखर सुमन रेखाबद्दल म्हणाले आहेत. रेखा आणि शेखर सुमनबाबत सांगायचं झाल्यास ‘संसार’ सिनेमातून शेखर यांनी रेखा यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

‘संसार’ या सिनेमात शेखर यांची फार मोठी भूमिका नव्हती. पण त्यांच्या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा यांच्यासोबत काम केल्यानंतर शेखर यांनी सिनेमा इंडस्ट्रीत काम करणारी सर्वात सुंदर महिला असल्याचं सांगितलं आहे. ज्याचा फक्त चेहरा नाहीतर मन देखील सुंदर असल्याचं शेखर यांनी बोलताना सांगितलं.

आजपर्यंत रेखा यांनी झगमगत्या विश्वात कोणतीच अभिनेत्री रेखा यांचं स्थान घेऊ शकलेली नाही. एक काळ असा होता फक्त चाहतेच नाहीतर सेलिब्रिटी देखील रेखा यांच्या सौंदर्यावर फिदा होते. रेखा आज 69 वर्षांच्या आहेत, त्यांचं सौंदर्य कमी झालं नाही.

News Title – Shekhar Suman Big Statement On Late Actress Rekha

महत्त्वाच्या बातम्या

‘आपल्याकडे आयुष्यात दोन…’; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज

पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवलं; पुढं जे झालं ते..

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार; वाचा एक्झिट पोलचा अंदाज

पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव