Shekhar Suman | मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. येथे संपूर्ण भारतातील लोक पाहायला मिळतील. महाराष्ट्रासाठी मुंबई ही अत्यंत महत्वाची आहे. आर्थिक उभारणीत मुंबईचा फक्त राज्यात नाही तर देशात वाटा आहे. अशात मुंबईबद्दल एका बॉलिवुड अभिनेत्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन याने मुंबईची तुलना थेट जंगलाशी केली आहे. शेखर सुमन सध्या ‘हिरामंडी’ मुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये शेखर सुमनने भूमिका साकारली आहे.यातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबईची तुलना थेट जंगलाशी
मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केल्याने शेखर सुमन आता वादात अडकण्याची शक्यता आहे. शेखर सुमनने मुंबईची तुलना जंगलाशी केली. मुंबईत माणसं नाही राहत तर जनावरं राहतात, त्यांना माणूस म्हणण्याची लाज वाटत असल्याचे शेखर सुमनने म्हटलं आहे.
एका मुलाखतीमध्ये शेखरला मुंबई आणि लखनऊ या शहरांमधील फरक विचारण्यात आला होता. यावर बोलताना तो म्हणाला की, “मुंबई हे शहर नाही. हे जंगल आहे. इथे लोक राहत नाहीत, इथे सगळे भीतीदायक लोक राहतात. इथला प्रत्येकजण रोबोट झालाय. इथले लोक दगड आहेत आणि ते काहीही असले तरी त्यांना हृदय आणि आत्मा देखील आहे.” आता शेखर (Shekhar Suman) यांचं हे विधान चर्चेत आलंय.
शेखर सुमनचे वादग्रस्त विधान
पुढे बोलताना तो म्हणाला की, “इथे सर्व लोक नुसते भटकत आहेत. कोणतेही नियम आणि कायदे नाहीत. इथे वेडे लोक आहेत, त्यांना काय म्हणावे? त्यांना माणूस म्हणायला मला लाज वाटते.या जंगलात राहायचे असले तर तुम्हाला स्वत: तुमचा रस्ता तयार करावा लागतो.”, असं शेखर सुमन याने म्हटलं आहे.
“माझ्याकडे मुंबईत राहण्याशिवाय पर्याय नाही. एक सुरक्षित ठिकाण प्रत्येकाला शोधावे लागेल. हे जंगल आणि राक्षसी लोकांपासून तुम्ही जितके लांब राहाल, तितकं आयुष्यात शांतता लाभेल आणि जितक्या जवळ जाल.”,असंही शेखर सुमन (Shekhar Suman) म्हणाला आहे.
News Title- Shekhar Suman compared Mumbai to a jungle
महत्वाच्या बातम्या-
देशभरात गाजलेल्या महादेव बेटिंग अॅपचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत; खळबळजनक माहिती समोर
चाणक्यांचे ‘हे’ 3 बहुमूल्य नियम पाळा; जीवनात यशाचं सर्वोच्च शिखर गाठाल
मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; प्रफुल पटेलांची पोस्ट चर्चेत मात्र माफी नाहीच
“राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, एका इव्हेंटचे किती पैसे घेतात?”
सिद्धू मूसेवालाच्या आईने 59 वा वाढदिवस केला साजरा, पोस्ट व्हायरल