बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय!

सिडनी | ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीनंतर पुन्हा जनजीवर सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

शेन वॉर्नची Seven Zero Eight Gin ही मद्य उत्पादन घेणारी कंपनी आता सॅनिटायझरचे उत्पादन करणार आहे. 70 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेले हे सॅनिटायझर ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटल्समध्ये देण्यात येणार आहेत. वॉर्ननं एका निवेदनातून ही माहिती दिली आहे.

शेन वॉर्न आणि त्यांचे दोन पार्टनर यांनी पुरस्कार विजेत्या SevenZeroEight gin चे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेत आहोत. त्याव्यतिरिक्त आम्ही आता पुढील सूचना मिळेपर्यंत सॅनिटायझर तयार करणार आहोत. पश्चिम ऑस्ट्रेलियातील दोन हॉस्पिटल्सना हे सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहेत आणि तसा करारही झाला आहे, असं वॉर्ननं सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सध्या सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळेच कंपनीनं सामाजिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं, वॉर्ननं सांगितलंय.

 

 

View this post on Instagram

 

So proud of the team ! Bloody awesome guys – well done to all @708gin ❤️

A post shared by Shane Warne (@shanewarne23) on

ट्रेंडिंग बातम्या-

कॉल ड्रॉप होत नाही अशी मोबाईल सेवा सरकारनेच सुचवावी- संजय राऊत

‘कोरोना’बचावासाठी संपूर्ण वेतन मतदारसंघाला; महाराष्ट्रातील ‘या’ तरुण आमदाराचा निर्धार

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

कोरोनापासून सावध राहा सांगत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग

राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा, फडणवीस समर्थक भाजप नेत्याला रोहित पवारांचे खडेबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More