‘वंदे भारत’चे चाक ‘या’ जिल्ह्यात तयार करणार; तरुणांना मिळणार मोठा रोजगार

Vande Bharat Express

Vande Bharat l सध्या वंदे भारत ही ट्रेन प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. अशातच आता महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद झाले असले तरी रेल्वेचे जाळे दिवसागणिक मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशातच आता अनेक नवनवीन रेल्वे ताफ्यात दाखल होत आहे. त्यातीलच एक ट्रेन म्हणजे वंदे भारत. या ट्रेनला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात लातूर या ठिकाणी रेल्वे कोच कारखाना आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे देखील वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार :

छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीमध्ये याविषयीचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. यावेळी शेंद्रा एमआयडीसीमधील Bonatrans India wheelset plant या कंपनीत वंदे भारत ट्रेनचे पार्ट तयार करण्याचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आता या माध्यमातून महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर येथील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये वंदे भारत ट्रेनचे पार्टस तयार करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या सहकार्याने तात्राव्यागोंका यांची ज्युपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी Bonatrans India wheelset plant या नावाने हा मोठा प्रकल्प सुरू करणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्ब्ल 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्या माध्यमातून तरुणांच्या हाताला देखील रोजगार मिळणार आहे.

Vande Bharat l जगात रेल्वे चाकांची मागणी वाढली :

वंदे भारतसह इतर ट्रेनच्या चाकांची देखील निर्मिती या प्रकल्पात करण्यात येणार आहे. तर भारतात ही कंपनी प्रथमच स्थानिक बाजारपेठ आणि परदेशासाठी व्हीलसेट तयार करणार आहे. या प्रकल्पात महिन्याकाठी तब्ब्ल 1 हजार इतके व्हील सेट तयार करण्याची क्षमता असणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात या प्रकल्पातून महिन्याकाठी तब्बल 5 हजार व्हील सेट तयार करण्यात येणार आहे.

याशिवाय भारतात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. तर जगातून ही रेल्वे चाकांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून ही मागणी पूर्ण करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. त्यामुळे आता लातूरनंतर मराठवाड्यात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला एक मोठा उद्योग आल्याने उद्योगांना चालना मिळणार आहे.

News Title : Shendra MIDC Vande Bharat

महत्वाच्या बातम्या-

आता थेट मुंबईच पाणी बंद करणार! अजितदादाच्या ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा?

..तर असं झालं नाही तर भाजप, शिंदे गट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार?

घराबाहेर आल्यावर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला…

नवरात्रीत शनि नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं भाग्य उजळणार

बंगळुरूतील घटनेनं देशभर खळबळ, फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे 30 तुकडे

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .