बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तालिबानी भारतासाठीही ठरू शकतात धोकादायक???’; शिया धर्मगुरू मौलानांचा भारताला गंभीर इशारा

काबुल | अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर त्या परिस्थितीवर सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे.  अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून पळून गेले आहेत. अशातच देशात बिघडलेल्या परिस्थितीवर शिया धर्मगुरू मौलाना कब्जे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला. तालिबानला वेळीच रोखलं नाही तर ते भारतासाठीही धोकादायक ठरू शकतील, असा इशारा मौलानांनी एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना दिला.

तालिबान हा अमेरिका आणि इस्त्राईलने उभारलेल्या क्रूर प्राण्यांचं संघटन आहे. या संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं भरली आहेत. जे लहान मुलांनाही सोडत नाहीत. पाकिस्तानात काही वर्षांपुर्वी या संघटनेने एका शाळेवर हल्ला करून निष्पाप लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा भयानक क्रुरता काय असु शकते?, असंही कब्जे जव्वाद यांनी म्हटलं आहे.

तालिबानच्या या कृत्यांना वेळीच आवर घालायला हवं. जर तालिबानला वेळीच रोखलं नाही तर तालिबानी भारतासाठी धोकादायक ठरी शकतात. यावेळी संपुर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागून आहे. परंतु तालिबानविरोधात जगात एकता दिसुन येत नाही. त्यामुळे तालिबानला रोखणं अत्यंत आवश्यक झालं आहे, असं मौलानांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकीकडे शिया धर्मगुरू अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे देशात असेही काही नेते आहेत की, ते तालिबानच्या क्रूरतेचे स्वागत करत आहेत, असंही मौलाना म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या फाटलेल्या नोटा?

भाजप मंत्र्याचा कारनामा; जिवंत सैनिकाला वाहिली श्रद्धांजली

महाविकास आघाडी म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे- देवेंद्र फडणवीस

“14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?”

“पटोले आडाणी भाषेत टीका करतात, मग दानवेंनी केली तर मिरच्या झोंबल्या का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More