बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यांना बळी पडू नका’, स्नेह भोजनात फडणवीसांच्या आमदारांना स्पष्ट सूचना

मुंबई | 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला 15 दिवस उलटूनही अद्याप त्यांचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांना धारेवर धरत आहे. दोन मंत्र्यांचे सरकार राज्य चालवत असून त्यांचे दौरे सुरु आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. तर राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट आमदारांची एक स्नेह भोजन भेट झाली.

या भेटीत आमदारांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिंदे-फडणवीस हा फेव्हिकॉलचा जोड आहे. तुटणार नाही, असे सांगत त्यांनी आमदारांमधील संभ्रम दुर केला. आपल्यात मतभेद निर्माण करण्याचे अनेकजन प्रयत्न करतील, त्यांना बळी पडू नका, असा सल्ला फडणवीसांनी आमदारांना दिला. आपल्याला कमी कालावधीत जास्त काम करायचे आहे, असे देखील फडणवीस म्हणाले.

राष्ट्रपतींच्या (President of India) निवडणुकीत शिंदे आणि भाजपचे एकही मत बाद होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) मोठ्या मताधिक्क्याने निवडून यायला हव्यात, असे यावेळी फडणवीस म्हणाले. मुर्मूंना आपल्या राज्यात 200 मते पडतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कुणाच्या वाट्याला मंत्रीपद आले नाही तर मतभेद निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका, असे यावेळी शिंदे म्हणाले.

दरम्यान, गेले काही दिवस हे सरकार बेकायदेशीर आहे, असे संजय राऊत सातत्याने बोलत आहे. तसेच त्यांनी ट्विट करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन राज्यपालांना केले आहे. या दोन मंत्र्यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाही, कारण घटनेप्रमाणे मंत्रीमंडळात कमीत कमी 12 मंत्री असने गरजेचे आहे. प्रा. हरी नरके (Prof. Hari Narake) यांच्या ट्विटचा हवाला देत राऊत यांनी हि मागणी केली. राज्यपाल याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप देखील राऊतांनी केला.

थोडक्यात बातम्या – 

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

सुशांतचं आयुष्य बरबाद केलं म्हणणाऱ्या सुशांतच्या बहिणीला रियाचं प्रत्युत्तर, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More