Shikhar Dhawan | भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिखरने सोशल मीडियावर पोस्ट करत घोषणा केली आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय.(Shikhar Dhawan )
शिखरने 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं.
शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर
हा व्हिडिओ पोस्ट करताना शिखरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे. मी माझ्यासोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद! जय हिंद.” आता शिखरच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.(Shikhar Dhawan )
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द
38 वर्षीय शिखरने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं. त्याच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने एकदिवसीयमध्ये 6793 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीयमध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतके आहेत. आज 24 ऑगस्ट 2024 रोजी शिखरने क्रिकेटला अलविदा म्हटलं.
शिखर धवनने इंडियन प्रिमियर लिगमध्येही चमकदार कामगिरी केलेली आहे. तो पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार राहिलेला आहे. आयपीएलमध्ये तो एकूण 222 सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने एकूण 51 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावलेली आहेत. त्याने भारताकडून शेवटचा सामना हा श्रीलंकेविरोधात 29 जुलै 2021 मध्ये खेळला होता. (Shikhar Dhawan )
News Title – Shikhar Dhawan Announces Retirement
महत्त्वाच्या बातम्या-
आज महाराष्ट्र बंद आहे की नाही?, कोर्टाच्या मनाईनंतर मविआने घेतला मोठा निर्णय
आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!
देवेंद्र फडणवीसांनी महिलांना दिली मोठी गुड न्यूज!
भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ