शिखर धवन पडला पुन्हा प्रेमात?, मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan l भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 2025 च्या आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. भारताने 229 धावांचे लक्ष्य 21 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) 5 बळींनंतर, शुभमन गिलने (Shubman Gill) फलंदाजीत कमाल केली आणि शतक (101) झळकावले.

शिखर धवनसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल :

हा सामना पाहण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड ॲम्बेसेडर (brand ambassador) शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत प्रेक्षक गॅलरीत एक परदेशी तरुणी बसलेली दिसली. ही तरुणी कोण आहे?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. घटस्फोट झालेला शिखर धवन पुन्हा एकदा परदेशी तरुणीला डेट करतोय का?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिखर धवन काही दिवसांपूर्वी एका परदेशी तरुणीसोबत विमानतळावर दिसला होता आणि आता भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात तो पुन्हा एका परदेशी तरुणीसोबत सामना पाहताना दिसला. समजलेल्या माहितीनुसार, ती महिला सोफी आहे, जिला धवन इंस्टाग्रामवर (Instagram) फॉलो करतो. यावरून दोघांमध्ये मैत्री असल्याचे दिसून येते. मात्र, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत की फक्त मित्र म्हणून सामना पाहण्यासाठी आले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिखर धवनचे वैयक्तिक आयुष्य :

शिखर धवनने 2012 मध्ये आयशा मुखर्जीशी (Ayesha Mukherjee) लग्न केले, जी त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. त्यांना एक मुलगाही आहे. काही काळापूर्वी शिखर धवन आणि आयशा विभक्त झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून शिखर धवन एकटाच राहतो.

मुलापासून दूर राहिल्याबद्दल त्याने अनेकदा दुःख व्यक्त केले आहे. धवनचा मुलगा त्याच्या आईसोबत ऑस्ट्रेलियात (Australia) राहतो. शिखर धवन सोशल मीडियावर अनेकदा मजेशीर पोस्ट शेअर करत असतो. काही महिन्यांपूर्वीही शिखर धवन एका परदेशी महिलेसोबत विमानतळावर दिसला होता.

News Title: Shikhar Dhawan Dating Again? Spotted With Mystery Girl!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .