दिल्ली | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शिला दीक्षित यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. एस्काॅर्ट रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आजारी असतानाही त्यांचं पक्ष बांधणीचं काम सुरूच होतं. कालच त्यांनी पक्षात काही संघटनात्मक बदल केले होते.
सर्वाधिक काळ त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या. 1998 तो 2013 या 15 वर्षांच्या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भुषवलं. त्यांच्या कार्यकाळात दिल्ली शहरात मेट्रो वेगवान विस्तारली आणि त्यांच्याच काळात रस्त्याचं जाळ अधिकाधिक विस्तीर्ण होत गेलं.
शिला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संपुर्ण दिल्लीवर सध्या शोककळा पसरली आहे.
Former Delhi Chief Minister & Congress leader Sheila Dikshit, passes away in Delhi at the age of 81 years. (file pic) pic.twitter.com/8rqv8qfnAQ
— ANI (@ANI) July 20, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं
Comments are closed.