बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

मुंबई | अश्लील फिल्म प्रकरणी अटकेत असलेला उद्योजक राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून अजूनही बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर आता इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

सेबीनं आज शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राशी संबंधित विआन इंडस्ट्रीज कंपनीबाबत कारवाई केली आहे. या कंपनीतील खुलास्यांमधील कमतरता आणि त्यासोबत इन्सायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 3 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

विआन इंडस्ट्रीज कंपनीवर प्रिफरेंशयल अलॉटमेंटबाबत माहिती देण्यात उशीर झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रिपु कुंद्रा यांच्या नावावर ही कंपनी आहे. दंड जमा करण्यासाठी त्यांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, सेबीने सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 या काळातल्या घडामोडींचा तपास केला. यावेळी इन्सायडर ट्रेडिंगच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, रिपू कुंद्रा या तिघांनी ही माहिती दडवून ठेवली असल्याचं तपासात आढळून आलं.

थोडक्यात बातम्या –

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर!

जयंत पाटलांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती!

देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत केलं जेवण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More