बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

मुंबई | बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या अश्लील चित्रपट प्रकरणाबाबत तुरूंगात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीला या प्रकरणामुळे खुप त्रास सहन करावा लागला. शिल्पा शेट्टी सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या डान्स रिअॅलिटी शोची परिक्षक आहे. राज कुंद्रा प्रकरणामुळे शिल्पा काही दिवस खुप चर्चेत होती. आज शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर करून तिच्या पूढील गोष्टीबद्दल सांगितलं आहे.

जरी कोणीही मागे जाऊ शकत नाही, परंतु एक नवीन सुरूवात करू शकते. आता सुरू करून कोणीही अगदी नवीन शेवट देखील करू शकतो, असं शिल्पा शेट्टीने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. यावरून शिल्पा शेट्टीने तिच्या भविष्यात काय करणार असल्याचे संकेत दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा चालू झाली आहे.

आम्ही चुकीचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. माझी इच्छा आहे की, आपण हुशार किंवा खूप चांगले असू शकतो. आपण कितीही विचार केला तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही. परंतु योग्य निर्णय घेऊन आपण पूढे जाऊ शकतो. जून्या चुकांची पुनरावृत्ती न करता आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले रहा. त्याचबरोबर शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पानाच्या शेवटी मी पूर्वी काय केलं त्यावरून माझी ओळख असू नये. मला जसं वाटतं, तसं मी माझे भविष्य बनवू शकते म्हटलं आहे.

दरम्यान, राज कुंद्रा प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीने अलिकडेच सांगितलं होतं की माझ्या मुलांच संगोपन माझ्या पैशातून करणार आहे.  सध्या शिल्पा शेट्टी रिअॅलिटी शो जजची म्हणून काम पाहत आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

“2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं, मात्र अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली”

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More