शिल्पा शेट्टी साईबाबांच्या चरणी; अर्पण केला एवढ्या लाखांचा सोन्याचा मुकूट!

शिर्डी | अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईदर्शनासाठी शिर्डीत हजेरी लावली. शिल्पा शेट्टींनी साईबाबांचं दर्शन घेऊन साईचरणी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे.

शिल्पा शेट्टी ही साईबाबांची भक्त आहे. ती दरवर्षी साईंचं दर्शन घेण्यासाठी येत असते. यावेळी तीने साईबाबांच्या चरणी 800 ग्रॅमचा सोन्याचा मुकूट अर्पण केला असून त्यांची किंमत जवळपास 25 ते 30 लाख रूपये असल्याचं समजतंय.

शिल्पा शेट्टींना आपल्या सहकुंटुंबासोबत धुपआरतीला हजेरी लावत साईंचं दर्शन घेतलं आणि मुकुट अर्पण करून शिल्पाच्या विंनतीवरून सुवर्ण मुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला.

दरम्यान, सोन्याचं दान किती आहे, यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भाव महत्वाचा असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी

-नेते आणि अधिकाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत; शहीद गोसावींच्या मामांचा सवाल

-आणखी एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आयुष्य संपवलं