बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजने तयार केलेले व्हिडीओ पॉर्न नाहीत, यापेक्षा जास्त व्हिडीओ तर…” शिल्पाचं धक्कादायक उत्तर

मुंबई |  राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. एवढंच नाही तर शिल्पाच्या घरात क्राईम ब्राँचने छापेमारी देखील केली आहे. पाॅर्नोग्राफी प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असून शिल्पाला या चौकशीवेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशातच एका प्रश्नावर तिने धक्कादायक उत्तर देत राजने तयार केलेले व्हिडीओ पाॅर्न नसल्याचं म्हटलं आहे.

चौकशी दरम्यान शिल्पाला पाॅर्न रॅकेट संदर्भात तुम्हाला माहिती आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शिल्पाने अतिशय धक्कादायक उत्तर दिलं आहे. राजने बनवलेले व्हिडीओ पाॅर्न नाही तर एरोटीक व्हिडीओ आहेत. एवढंच नाही तर अशे व्हिडीओज अनेक ओटीटी प्लॅटफाॅर्मवर देखील आहेत, असं देखील शिल्पाने म्हटलं आहे.

राज जे व्हिडीओ बनवतो अशेच व्हिडीओ अनेक ओटीटी प्लॅटरफाॅर्मवर बनवले जात असून यांपैकी अधिक करुन ओबसीन्स असतात, असं शिल्पाने चौकशी दरम्यान म्हटलं आहे. शिल्पा प्रमाणेच राज कुंद्राने देखील या प्रकरणात शिल्पाचा हात नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, पाॅर्नग्राफीतील पैसे शिल्पाच्या खात्यामध्ये गेले आहेत का, याचा तपास लावण्यासाठी क्राईम ब्रँच कडून आता शिल्पाच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच राजसोबत शिल्पा कोणत्या गोष्टीमध्ये शामिल आहे का? याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. मात्र आद्याप शिल्पाचा थेट संबंध जोडता येईल असा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

#TokyoOlympics | मिराबाई तुझा भारताला अभिमान, मिळवून दिलं पहिलं पदक

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

राज कुंद्राला ‘या’ अभिनेत्रीचा सपोर्ट, म्हणाली…

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो… ‘डीमॅट’च्या नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More