बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

मुंबई | आपल्या सौंदर्याने सर्वांच्या मनावर राज करणारी बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत येऊन लोकांचं मन चोरत रत आहेत. हंगामा 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अशातच या चित्रपटातील ‘चुरा के दिल मेरा’ हे पहिलं गाणं देखील रिलीज झालं आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 13 वर्षानंतर ‘हंगामा 2’मधून चित्रपट विश्वात परतत आहे. ती अखेर 2007मध्ये आलेल्या ‘आप’ या चित्रपटात दिसली होती. शिल्पाच नव्हे तर राजपाल यादव देखील बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहेत. त्यामुळे या विनोदी धमालीची सगळेच चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट करत शिल्पा शेट्टीने या संदर्भात माहिती दिली. गाणं शेअर करताना शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर कॅप्शन लिहिले की, ‘नवीन बाटलीमध्ये जुनी वाईन, अक्षय कुमारला मिस केले, मात्र सध्या मीझानचे मन जिंकण्याची वेळ आली आहे.’ शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘हंगामा 2’ या तिच्या कमबॅक चित्रपटाचे ‘चुरा के दिल मेरा 2.0’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे.

दरम्यान, या चित्रपटात शिल्पा शेट्टी चक्क परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे. परेश रावल गोंधळून जातात की, मीझान त्यांची पत्नी शिल्पाचा प्रियकर आहे. परेश रावल यांचा हा गोंधळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पोट धरून हसायला लावतो. आता हा गोंधळ कसा दूर होतो हे या चित्रपटामध्ये दाखवलं आहे.

पाहा गाणं:

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार?

मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं- देवेंद्र फडणवीस

आलिया आणि रणवीरचा ‘हा’ चित्रपट होतोय रिलीज, करणने पुन्हा बनवली प्रेम कहाणी

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More