बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 वर्षाच्या समीशासह शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरी असलेले सर्व लोक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत शिल्पा शेट्टीने या संदर्भात माहिती दिली.

गेले 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझी सासू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर समीशा, विवान, माझी आई आणि आता राज. याक्षणी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नियमांनुसार ते आपापल्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत, असं शिल्पाने सांगितलं.

आमच्या घरातील दोन कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यांच्यावर वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करत आहोत, असंही शिल्पा शेट्टीने सांगितलं.

शिल्पा शेट्टीच्या कोरोना चाचणीचा  रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सर्व नियमांनुसार, सर्व खबरदारी घेतली जात आहे आणि आम्ही बीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीबद्दल आभारी आहोत, असं शिल्पाने म्हटलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यात फक्त ‘या’ वयोगटालाच लसीकरण, आजच निर्णय होण्याची शक्यता

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण!

“विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका, ते नैराश्यात आहेत”

“अजितदादा धडाडीचे नेते, उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?”

‘छोटा राजन जिवंत आहे’; AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More