बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

मुंबई | राज कुंद्राच्या अटकेमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीने नुकताच आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने चक्क अर्ध टक्कल केलेला दिसत आहे.

शिल्पा शेट्टीने 3 दिवसांपूर्वीच एक योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने तिचा नवीन हेयरकट सर्वांना दाखवला आहे. ती जिममध्ये योगा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तीचा हेयरकट दिसून आला आहे. मात्र शिल्पाने केलेल्या हेयरकटमध्ये तीने मागून पूर्ण केस काढल्याचं दिसत आहे.

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ती म्हणतेय, तुम्ही प्रत्येक दिवस विना रिस्क नेहमी कंम्फर्ट झोनमध्ये नाही जगू शकत. मग तो अंडरकट बज असो कींवा इतर काही, असं म्हणत तीने कंसात लिहिलं आहे. ( खर सांगू, यासाठी खुप जास्त हिमंत लागते), असं कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिलं आहे.

शिल्पाने केलेल्या हेअरकटमध्ये डोक्याच्या मागच्या बाजूचे पूर्ण केस काढले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी या हेअरकटबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी तीच्या हेयरकटची चेष्टा उडवली आहे तर काहींनी तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More