बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वयाच्या 10व्या वर्षी शिल्पा शेट्टीचा मुलगा बनला बिझनेसमॅन

मुंबई। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 90 चं दशक चांगलच गाजवलं होतं. तिच्या अभिनयावर आणि अदांवर चाहते फिदाच व्ह्याचे. चाहत्यांवर तिने आपल्या बोल्ड अभिनयाची छाप टाकली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पाठोपाठ आता तिच्या मुलाने वयाच्या दहाव्या वर्षी नाव कमवायला सुरवात केली आहे. शिल्पाचा मुलगा विआन राज कुंद्रा हा वयाच्या 10 व्या वर्षी बिझनेसमॅन बनला आहे.

अतिशय कमी वयात विआननं व्यवसाय सुरु केलाय आणि हे ऐकून अनेकांना धक्क्का बसला. मात्र, ही गोष्ट खरी आहे आणि शिल्पा शेट्टीने या बातमीचा खुलासा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. शिल्पा म्हणाली की, विआन हा पहिला आणि वेगळा व्यवसाय सुरु करत आहे, त्याचं नाव @vrkickss असून तो कस्टमाइज स्नीकर्स बनवतो.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More