फिल्म इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, सगळं सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे

फिल्म इंडस्ट्रीत रेप होत नाहीत, सगळं सहमतीनं होतं- शिल्पा शिंदे

मुंबई | सिनेमा इंडस्ट्रीत बलात्कार होत नाहीत, बळजबरी होत नाही. ज्या गोष्टी होतात त्या परस्पर सहमतीने होतात, असा धक्कादायक खुलासा बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदेनी म्हटलं आहे. ती एका वृत्तवाहीनीशी बोलत होती.

जेव्हा घटना घडते त्याचवेळी त्याविरोधात आवाज उठवा, नंतर बोलून काही उपयोग नाही. कारण नंतर तुमचं म्हणणं कोणी एेकणार नाही,  असा सल्ला शिल्पाने या महिलांना दिला आहे.

माझ्यासोबत असा प्रकार घडला तेव्हा माझ्या मदतीला कोणी आलं नाही. माझी लढाई मी स्वत:च लढले. आताही जे होतंय ते सर्व बकवास आहे, असंही तिनं म्हटलं आहे.

दरम्यान, समोरची व्यक्ती कशी वागते, त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देता त्यावर हे अवलंबून आहे, असंही तिनं यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचा पंजा असलेल्या बाईकवरुन भाजप आमदाराची सवारी!

-भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार!

-नाना पाटेकर आणि साजिद खान असलेल्या चित्रपटात काम करण्यास अक्षय कुमारचा नकार

-निशांत संघाचा स्वयंसेवक नाही; खोटी माहिती पुरवणाऱ्यांविरोधात तक्रार

-शिवसेना-राष्ट्रवादीत चाललंय काय? मातोश्रीवर आव्हाड-ठाकरे भेट

Google+ Linkedin