बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!

मुंबई | छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि लोकप्रिय शो असलेल्या बिग बाॅसच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून ‘बिग बाॅस ओटीटी’वर काल रात्रीपासून सुरु झालेलं आहे. शो सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर सर्वत्र शोची चर्चा पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या सूत्रसंचालनाची धुराही यंदा करण जोहर सांभाळताना दिसत आहे. अशातच आता राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत असलेली शमिता शेट्टी पुन्हा एकदा बिग बाॅसमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

बिग बाॅसच्या घरात यावर्षी अभिनेत्री शमिता शेट्टी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र आता शमितानं बिग बाॅसच्या घरात हटके अंदाजात एन्ट्री करत यावर शिक्कामोर्तब केला आहे. तिच्या एंन्ट्रीनं सगळ्यांच्या नजरा खिळून ठेवल्या. सध्या सोशल मीडियावर शमिता शेट्टीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

राज कुंद्रा प्रकरण सध्या एवढं चिघळत असाताना आणि कुटुंबावर अडचणीचं सावट असताना शमितानं बिग बाॅसमध्ये सहभाग नोंदवला म्हणून तिच्यावर टिका करण्यात येत होत्या. त्यामुळे एन्ट्री करताच शमितानं याविषयी खुलासा केला आहे. तिनं म्हटलं की, ज्यावेळी सर्व काही सुरुळीत होतं तेव्हा कमिटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणं आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत आहे.

दरम्यान, राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या हे प्रकरण सगळीकडे चर्चेचा विषय आहे. यातच त्यांच्या कुटुंबियांना, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बहिण शमिताला भरपूर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता या परिस्थितही शमितानं बिग बाॅसच्या शोमध्ये प्रवेश केला असल्यानं तिच्याकडून काय काय पाहायला मिळणार, काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे

‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर

मनसेकडून ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत!

रोख व्यवहार करणाऱ्यांनो वेळीच व्हा सावधान; 10 व्यवहार केल्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More