Eknath Shinde | काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत घेत त्यांची भूमिका मांडली. यावेळी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कार्यकाळातील लेखाजोखा सांगितला. तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचे संकेतही दिले.
एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेही मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही. अडीच वर्षांच्या प्रवासाबाबत मी समाधानी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री होणार नाही हे संकेत त्यांनी दिले आहेत. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. मुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी सामन्य लोकांसाठी काम केलं आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत आम्ही चांगलं काम केलं. माझ्या कामाबद्दल मी समाधानी आहे. आम्हाला मोदी आणि शाह यांचं पूर्ण पाठबळ होतं. आम्ही सरकार बदललं आणि उठाव केला तेव्हा अमित शाह पाठिशी होते. ते अडीच वर्ष माझ्यापाठी होते. मला सुरुवातीचे दिवस आठवतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवसाचा वापर राज्यासाठी केला, असं शिंदे म्हणालेत.
महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. असा विजय यापूर्वी कधी मिळाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त करतो. महायुतीवर जनतेने विश्वास दाखवला. मी 80 ते 100 सभा घेतल्या, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाला मिळणार डच्चू?
श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी
‘लग्नाआधी सेक्स करणं…’, अभिनेत्री रेखा यांचा मोठा खुलासा!
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून 2100 रुपये मिळणार