बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना झाला तरी राज्यात अजून मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधक सतत टोलेबाजी करत असतानाच, शिंदे सरकारचा  मंत्रीमंडळ विस्तार 5 ऑगस्टला होणार होता. त्यातच आता शिंदे गटाची आणि शिवसेनेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार 5 ऑगस्टला होणार की लांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गट आणि शिवसेनेचा(Shivsena) न्यायालयातील वाद तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयाोगला तूर्तास कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे शिंदे सरकारचे मंत्रीमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असली तरी मंत्रीमंडळ विस्तार करायचा की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. जरी सरकारला विस्तार करायचा असला तरी राज्यपालांची मंजूरी आवश्यक असते. त्यामुळे राज्यपाल  काय निर्णय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु  असं असलं तरी न्यायालय सर्व निर्णय रद्द करू शकतं, असं जेष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार होण्यास कायदेशीर अडथळे नाहीत, याबाबत न्यायलयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे सरकार  मंत्रीमंडळ विस्तार करू शकते, असं जेष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी सांगितले आहे. पण शिंदे गट 8 ऑगस्ट पर्यंत थांबू शकते, असंही कळसे म्हणाले. तसेच हे प्रकरण घटणापीठाकडे जावं असही मत त्यांनी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ईडीच्या तपासात महत्त्वाची समोर

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी

…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

शिंदे गटाचा तो आरोप खोटा?, शिवसेनेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More