शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दिली मोठी गुडन्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाविकास आघाडीचं(Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारनंही(Shinde-Fadnvis Goverment) मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे.

महाविकास आघाडीनं नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रूपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनाचं संकट आणि त्यानंतर झालेलं सत्तांतर त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घोषणेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

आता विद्यमान सरकारनं महाविकास आघाडीचा हा निर्णय अबाधित राखत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळं याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. याच योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती.

दरम्यान, 2017 पासून 2020 पर्यंतच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन वर्षांची नियमित कर्जफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-