“शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर, सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदे-ठाकरे गटाकडून सातत्यानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातच शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले आहे. राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह(Eknath Shinde) अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले आहे. या हिवाळी अधिवेशनात सरकारचा गोंधळ पाहायला मिळाला. सरकारमध्येच आता दोन गट पडले आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असं मी म्हणलं होतं. यावर मी ठाम आहे. कायद्यानुसार 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. सध्या सरकार व्हेंटिलेटरवर आहे. जनतेलाही चांगलंच ठाऊक आहे की, हे सरकार कधी उलथावायचं, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.

सध्या राज्यातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळं हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असं राऊत पुन्हा एकदा आवर्जून म्हणाले आहेत. यावेळी राऊत नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, शिंदे सरकार फार काळ टीकणार नाही असं विरोधी पक्षातील अनेक नेते म्हणत असतात. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकार टीकेल की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-