सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा धक्का!

मुंबई | अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारने धक्का दिला आहे. सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकाऱ्यांना हा धक्का दिला आहे. राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावं लागणार आहे.

पुणे विभागातील 13 तहसीलदारांच्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने केल्या आहेत. या सर्व जणांना 17 तारखेपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सहसचिव माधव वीर यांनी काढले आहेत.

पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, मावळ, वेल्हा ,मुळशी या पाच तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-