मुंबई | शिंदे सरकार सत्तेत येऊन बरेच दिवस लोटले, मात्र या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. अखेर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील आमदारांसाठी ही मोठी बातमी आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेतील मोठा गट फुटला आणि सूरतमार्गे गुवाहाटीला जाऊन थांबला, त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत देखील आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपण सर्व आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची घोषणा केली होती.
आता शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत, या दौऱ्यानंतर शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गुवाहाटीची कामाख्या देवी नेमकी कुणाला पावणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तत्पूर्वी शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काही जणांनी यापूर्वीच आपली नाराजी बोलून दाखवली आहे, त्यामुळे या आमदारांना आता मंत्रिपदी संधी मिळणार का?, न मिळाल्यास काय होणार?, हे आगामी काळात कळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या- रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, संभाजी भिडेंनी केली ‘ही’ विनंती