मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर
मुंबई | मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
ठाकरे सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सध्या राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयाने स्वस्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांनी केली आहे.
नगराध्यक्ष आणि संरपचाची निवड आता थेट नागरिकांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णयही आज घेण्यात आला. आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच मेट्रो (Metro) ट्रेनलाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन योजनेच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र टप्पा-2 राज्यात राबवणार आहे. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा दोन हे अभियानही राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.
थोडक्यात बातम्या
शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, बंडखोर आमदाराचं सूचक वक्तव्य
‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा?’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
“संजय राऊतांना हटवा, घर जाळायला हेच जबाबदार”
Comments are closed.