बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जितेंद्र आव्हाडांना शिंदे सरकारचा सर्वात मोठा झटका

मुंबई | शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांना झटक्यावर झटके देत आहे. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळातले अनेक महत्त्वाचे निर्णय शिंदे सरकारने बदलले होतो. यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनाही (Jitendra Awhad) शिंदे सरकारने मोठा झटका दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेले सगळे निर्णय हे गृहनिर्माण क्षेत्राशी संबधित आहेत. त्यामुळे आता या सगळ्या निर्णयाचे अधिकार म्हाडा (mhada) आणि विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत.

यापूर्वी आव्हाडांच्या निर्णयामुळे म्हाडाला सरकारवर अंबलबून राहायला लागत होतं. शिंदे सरकारने बदललेल्या या निर्णयामुळेेेेे आता सगळे अधिकार म्हाडाला असतील. यामुळे आता नवीन जीआर (GR) काढले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी हा निर्णय जारी करण्यात आला. यामुळे जितेंद्र आव्हाडांना शिंदे सरकारने सर्वात मोठा झटका दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. या निर्णयावर अजूनतरी विरोधी पक्षातून कोणतही मत आलं नाही. मात्र यामुळे पुन्हा राजकारण (politics) तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

आदित्य ठाकरेंनी ‘ती’ एक गोष्ट केली असती तर वेदांता आज महाराष्ट्रात असता

काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर मौन सोडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More