Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज 8 नोव्हेंबररोजी धाराशिव येथे सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती तथा माजी नगरसेवक सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे. (Uddhav Thackeray)
या सर्वांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. या प्रवेश सोहळ्याला जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील उपस्थित होते. शिंदे गटाच्या या प्रमुख नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच या नेत्यांनी साथ सोडल्याने मतदारसंघात याची जोरदार चर्चा आहे.
वरळीसह धाराशीवमध्ये शिंदे गटाला धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, सागर मुंडे यांच्यासोबत माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफिक काझी, मनीष पुरी आदी आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वरळीमध्येही शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. उपविभागप्रमुख तसेच दोन शाखाप्रमुखांसह पाच पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय. (Uddhav Thackeray)
मनसेचे अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेत
वरळीमध्ये शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, शाखा प्रमुख श्रीकांत जावळे आणि शिंदे गटाचे नेते अन्वर दुर्रानी यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला आहे. या सर्व नेत्यांचं आदित्य ठाकरे यांनी स्वागत केलंय. ‘आमच्यावर प्रेम करणारे लोक हे पुन्हा एकदा आमच्यासोबत येत आहेत. तुमची निराशा होऊ देणार नाही, याची खात्री देतो’, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दुसरीकडे, मनसेच्या काही नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची वाट धरली आहे. आज सकाळीच मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच चित्रे यांनी मनसेवर गंभीर आरोपही केले आहेत.
मनसे उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही, तर दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे बोलले होते की, मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही, मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या. त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली, त्यांना ही उमेदवारी निवडून आणण्यासाठी नाही, तर दुसरे उमेदवार पाडण्यासाठी दिली गेली, असंही चित्रे म्हणाले. या सर्व नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद ही आता वाढली आहे. (Uddhav Thackeray)
News Title : Shinde group and MNS leaders joins Uddhav Thackeray group
महत्वाच्या बातम्या –
सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव; जाणून घ्या आजचे दर
“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत
रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!
प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!