बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटाचा शिवसेना आमदारांना झटका, आदित्य ठाकरेंना मात्र मोठा दिलासा

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राजकारणात रोज नवे ट्विस्ट पहायला मिळत आहेत. 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (CM) झाले तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. हा ट्विस्ट संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) अचंबित करणारा होता. काल शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले. बहुमतचाचणीपूर्वी हा मोठा धक्का शिवसेनेला मिळाला होता.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले य़ांनी बहुमतचाचणी वेळी शिंदे गटाच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप जारी केला होता. हा व्हिप न पाळल्याने शिंदे गटाने शिवसेना आमदारांना नोटीस पाठवली आहे. सेनेच्या 15 आमदारांपैकी 14 आमदारानां निलंबनाची (suspension) नोटीस पाठवण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंना मात्र ही नोटीस पाठवण्यात आली नाही.

आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो, त्यामुळे आदित्य ठाकरे य़ांना नोटीस पाठवण्यात आली नाही, असं स्पष्टिकरण भरत गोगावले यांनी दिलं. तर रविवारी विधिमंडळाने एकनाथ शिंदे यांनाच गटनेता ठरवत अनिल चौधरी यांचं गटनेतेपद रद्द केलं. त्यात आता शिवसेनेच्या 14 आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला.  शिंदे सरकारने बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर बहुमत चाचणीनंतर अधिकृतरीत्या भाजप (BJP) आणि शिंदे गट आता सत्तेत आला आहे.

थोडक्यात बातम्या

पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

‘आम्हाला डुकरं म्हणतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात’,गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

“मागच्या मुख्यमंत्र्यांनी नाक्यावरची भाषणं आणि टोमणे मारण्यापलीकडे काही केलं नाही”

लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच ‘ही’ सुविधा मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More