मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतंच ते मर्यादीत राहिले होते. तसेच उद्धव साहेबांच्या घरच्यांचे पक्ष संघटनेत हस्तक्षेप व्हायला लागले. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या, असं सांगत शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेला बदल लोकांना देखील जाणवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिलं. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणं तपासली पाहीजेत, असं गोगावले म्हणालेत.
एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 आमदार, 13 खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो कार्यकर्ते आज त्यांच्यापासून बाजूला होत आहेत. तेही सत्ता असताना पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवं, अशी सूचना भरत गोगावले यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर नारायण राणे, गणेश नाईक आणि अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले, तेव्हा साहेबांनाही याची प्रचिती आली होती. त्यामुळे याचे आत्मचिंतन करणं गरजेचं होतं, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-