Shinde Group | राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्यात महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्वच पक्ष व आघाड्यांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. अनेक उमेदवारांनी आपले अर्ज देखील दाखल केले आहेत. यातून त्यांच्या मालमत्तेबाबतचा तपशील समोर येत आहे.शिंदे गटातील उमेदवारांनी देखील आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक उमेदवार असे आहेत, ज्यांची संपत्ती 5 वर्षात दुप्पट-तिप्पट नाही तर दहापट वाढली आहे. (Shinde Group)
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यातून शिरसाट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 13 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय.
यासोबतच भाजपने मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना देखील पक्षाने छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचं तिकीट दिलंय. त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अतुल सावे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यानुसार त्यांच्या संपत्तीत देखील गेल्या पाच वर्षात 17 कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
संजय शिरसाट यांची एकूण संपत्ती
संजय शिरसाट यांची 2019 मध्ये जंगम संपत्ती ही 1.21 कोटी होती. आता 2024 मध्ये त्यांची जंगम संपत्ती ही 13.37 कोटी आहे. तर, त्यांची स्थावर संपत्ती ही 2019 मध्ये 1.24 कोटी होती. आता 2024 मध्ये त्यांची स्थावर संपत्ती 19.65 कोटी आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सध्या 1.42 कोटींचे सोने आहे. सोबतच 4 कोटी 37 लाख 60 हजार 761 रुपये किमतीची शेतजमीन, तर 4 कोटी 70 लाख 45 हजार 860 रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत. (Shinde Group)
अतुल सावे यांची संपत्ती
अतुल सावे यांची 2019 मध्ये जंगम संपत्ती ही 15.69 कोटी होती. आता 2024 मध्ये त्यांची जंगम संपत्ती ही 28.79 कोटी आहे. त्यांची सध्या स्थावर संपत्ती 10.40 कोटी आहे. सोबतच 32.02 लाखांचे सोने देखील आहे. याशिवाय 1.26 कोटी रोख आहेत. 58.51 लाखांचे त्यांच्याकडे वाहने देखील आहेत. (Shinde Group)
News Title : Shinde Group mla Sanjay Shirsat Wealth
महत्वाच्या बातम्या-
न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?
दिवाळीतही धो-धो बरसणार?, हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा
“विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, नीच लोकांना त्यांची जागा..”; सत्यजित तांबे संतापले
ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं