बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुबंई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि इतर 16 आमदारांनी पक्षाकडून निधी मिळत नसल्याचा आणि पक्षश्रेष्ठी लक्ष देत नसल्याचा आरोप करत बंड पुकारला. यानंतर शिंदेना पाठींबा देण्यासाठी अनेक नेते आणि आमदार पुढे आले. शिंदे गटासोबत असणाऱ्यांची संख्या 40 इतकी झाली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. खरी शिवसेना आम्हीच आहोत, असं सांगत शिंदे गटानी पक्षावर हक्क सांगितला आहे. ही राजकीय लढाई आता कोर्टात (court) गेली आहे. कोर्टाची पुढील सुणावणी 1 ऑगस्टला होणार आहे.

याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यात शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं आहे.

भविष्यात जर शिंदे-फडणवीस सरकारचा मला 40 आमदार मनसेत विलीन करुन घेण्यासाठी प्रस्ताव आला तर याचा मी विचार करेन असं ते म्हणाले आहेत. यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल का? असं विचारलं असता, माझ्यासाठी माझा पक्ष आधी, माझ्या पक्षातील माणसं आधी यांना प्राधान्य असेल राज ठाकरे (Raj Thackery) म्हणाले.

दरम्यान, मध्यंतरीच्या काही निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा होती. त्यानंतर त्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्यावरही काही आरोप केले आहेत. हा माणूस बोलतो वेगळं, वागतो वेगळं मला त्या निघून गेलेल्या लोकांचं वाईट वाटत आहे. मी खूप पूर्वीपासून ओळखतो त्याला तो कसा आहे, असं ते या मुलाखतीत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!

“शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश”

नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More