बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई | महाविकास आघाडी सरकार (MVA) पडताना आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देण्यापूर्वी दोन महत्वाचे निर्णय घेतले होते. एक म्हणजे औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर संभाजी नगर (Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव (Dharashiv) तर दुसरा नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्ह येत राजीनामा दिला होता.

त्यानंतर या निर्णयावर बरीच राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. एमआयएमने याला विरोध केला होता. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे आमदार, हा निर्णय घेण्याचा महाविकास आघाडीला अधिकार नाही, असं म्हणत होते. महविकास आघाडी सरकार तेव्हा अल्प मतात होतं, त्यांचे दोन तृतीअंश आमदार पक्षातून बाहेर पडले होते. अशा वेळी त्यांनी कॅबिनेट बैठक घेतली. हा निर्णय असंविधानिक होता, असं भाजप आणि शिंदे गटाचं मत होतं.

आता यावर शिंदे सरकारने पुन्हा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय हा उगवत्या सुर्याच्या साक्षीने घेतलेला निर्णय आहे. मावळत्या सरकारप्रमाणे जबाबदारी झटकणारा हा निर्णय नाही. या निर्णयाचा नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असताना 29 जूनला त्यांनी हा निर्णय घाईगडबडीत घेतला, पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. आज नामांतर संदर्भातल्या फेरप्रस्तावाला रीतसर मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासंदर्भात ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवू. त्याचा पाठपूरावा करुन ते देखील आम्ही लवकर मंजूर करुन घेऊ, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“शिवसेनेच्या 40 आमदारांना मनसेमध्ये घेण्यासाठी फडणवीस-ठाकरे भेट?”

मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता…

“4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…”

उद्धव ठाकरे जबरदस्त कमबॅक करण्याच्या तयारीत; घेतला मोठा निर्णय

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More