शिंदेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात आणणार तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांची गुंतवणूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक व्हावी या हेतूने दावोस येथील परिषदेला गेले होते. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून काही महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारसोबत 20 उद्योंगाचे 1 लाख 4 कोटी रूपयांचा करार होण्याची शक्यता आहे. तसेच एवढे मोठे करार होण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) आपली प्रतिक्रिया दिली आहे. दावोसमध्ये कितीही करार होऊदे पण जेव्हा महाराष्ट्रात प्रत्यक्षात गुंतवणूक होईल, तेव्हाच याबबत वक्तव्य करू असं राऊत म्हणाले आहेत.

राज्यात 1 लाख 4 कोटींची गुंतवणूक येत असले तर स्वागतच. पण यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे अडीच लाख कोटी रूपयांची गुंतवणूक जी महाराष्ट्रात येणार होती ती आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. हे उद्योग परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्नदेखील केले नाहीत, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

दावोसलात गुंतवणूकदारांची जागतिक यात्रा भरते. त्या जत्रेतून ते सव्वालाख कोटी आणणार आहेत. ते प्रत्यक्षात आणल्यावर आम्ही बोलू, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-