बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला

मुंबई | संतोष बांगर शिंदे गटात सामील झाल्यानंतर हिंगोलीतील सतंप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांना शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यानंतर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख (District Head) पदावरुन हटवण्यात आलं होतं. संतोष बांगर म्हणाले मी अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि ते यासंबधी शक्तीप्रदर्शन करणार होते.

आज संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईत दाखल झाले. अग्रदूत या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर पोहोचून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्याचा सत्कारही केला. यावेळी शिंदेनी संतोष बांगर (Santosh Bangar) आणि आमदारांची समजूत काढली.

मी मुख्यमंत्री झालो आहे. सर्व शिवसैनिकांच्या निर्णयामुळे मी शिवसैनिक झालो आहे. त्यामुळे मी एकटा मुख्यमंत्री नसून तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेना सत्तेत आली आहे. संतोष बांगर यांना कुणीही पदावरून हटवू शकत नाही. ते जिल्हाध्यक्षपदी कायम असणार आहेत, असं वक्तव्य करत शिंदेनी ठाकरेंच्या निर्णयाची उचलबांगडी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे काही कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत ही भूमिका मांडण्यासाठी ते दाखल झाले आहेत. या हिंगोलीतील सर्व शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे आज संवाद साधतील. यापुढील आता शिंदेच्या या चॅलेला काय प्रत्युतर देणार हे पाहणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त

‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले

मुर्मू की सिन्हा? शिवसेना कोणाला पाठींबा देणार?, वाचा सविस्तर

‘…तर सलमान खानला जीवानिशी मारु’, लॉरेन्स बिश्र्नोईने आणखी एकदा दिली धमकी

‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More