बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) ईडीकडून(ED) चौकशी सुरु होती. चौकशीनंतर राऊतांना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ईडीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान राऊतांच्या विक्रोळी या निवास्थानी 11 लाख 50 हजार रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्यात दहा लाखांच्या पाकीटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) यांचं नाव दिसून आलं. यावर आता शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दहा लाख रूपयांच्या पाकीटावर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा, असा उल्लेख आढळून आला आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही अयोध्या दौरा सोबत केला होता, पण तो आमचा भावनेचा विषय आहे. त्या पाकीटावर माझे नाव का आहे, हे मला माहित नाही, ते राऊतांनाच विचारावं लागेल, असं स्पष्टीकरण शिंदेनी यावर दिलं.

ईडीने जप्त केलेली रक्कम ही अयोध्या दौऱ्याशी संबधित आहे. ईडीने घरात असलेल्या काही कागदपत्रांची पडताळणी केलेली असून त्यातील काही कागदपत्रे ईडीने सोबत नेली आहेत. सोबत नेलेली कागदपत्रे काही कामाची नाहीत. तसेच ईडी अधिकाऱ्यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी कोणतेही पुरावे आणि कागदपत्रे मिळाले नाहीत, अशी माहिती संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे.

काल चौकशी दरम्यान ईडीला राऊतांच्या घरी मालमत्तेची काही कागदपत्रे सापडली आहेत. ही मालमत्ता यापूर्वी ईडीला माहित नव्हती. त्यामुळे आता ही मालमत्ता बेनामी आहे का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ईडीच्या वतीने संजय राऊतांना दहा दिवसांची कोठडी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही’, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More