सदाशिव लोखंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर; शिवसेना प्रमुखांची घोषणा!

शिर्डी | शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी ही घोषणा केली आहे.

विरोधी पक्षनेत्याची झूल घालून सुद्धा लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. यावेळी शिर्डीतून सेनेचा भगवा फडकवा. मी तुम्हाला न्याय देईल, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या दृ्ष्टीने शिवसेनेनं आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. शिर्डीमधून या दौऱ्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्या रात्री नेमकं काय घडलं?; अमृतसर दुर्घटनेतील ड्रायव्हरनं दिलं लेखी उत्तर

-मला खुर्ची नको, फक्त तुमचं प्रेम हवंय; उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना

-काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता; आणखी दोन आमदार भाजपमध्ये जाणार?

-कसलीही लाट येवो यावेळी उस्मानाबादचा खासदार राष्ट्रवादीचाच!

-…म्हणून मी भाजपसोबत सत्तेत आहे; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा