बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साई जन्माचा वाद चिघळला, शिर्डीत बेमूदत बंद!

शिर्डी | साई बाबांच्या जन्मस्थळाच्या हक्कावरून शिर्डी -पाथरीत चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साईंबाबांचं जन्मस्थळ म्हणून 100 कोटींची घोषणा केली यावर आमचा आक्षेप असल्याचं, स्थानिकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री बैठक घेऊन या वादावर काही तोडगा काढत नाही किंवा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही रविवारपासून शिर्डी बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं शिर्डीतील स्थानिकांनी सांगितलं आहे.

या बंदात सर्व हॉटेल, शहरातील दुकाने आणि लॉज बंद राहणार आहेत. यामध्ये साईंच मंदिर सुरू राहणार आहे. त्यासोबतच भक्तनिवास आणि मंदिराचं कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती समजत आहे. यादरम्यान शिर्डीला जाणाऱ्या सर्व भक्तांचं आणि पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

आंदोलन करून तुम्ही हे सत्य लपवू शकत नाहीत. तुम्ही शिर्डी बंद करत आहात तर आम्ही पण पाथरी बंद करू पण अशा बंदने सत्य बदलणार नाही. साई बाबांचा जन्म हा पाथरीतच झाला आहे. याचे आम्ही पुरावे देऊ शकतो, असं पाथरीतील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, साईंनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण दिली मात्र आता हेच साई आता दोन शहरांमध्ये वाद सुरू आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेना भवनावरील महाराजांचा फोटो काढून तो बाळासाहेबांच्या आधी लावा, अन्यथा”

संजय राऊतांनी तसं बोलायला नको होतं; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More