बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

सांगली | राज्यातील सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाने धिंगाणा घातला असून मुसळधार पावसामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तर इकडे सांगली जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावासाने तडाखा लावला आहे. त्यामुळे सांगलीमधील कृष्णा आणि वारणा नद्यांना पुर आला आहे. त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील शिरगावाला चारही बाजूने पाण्याने वेढलं असल्याची माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

सांगलीतील शिरगावला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने नागरिक अडकले आहेत. मात्र शिरगावातून 200 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. संध्याकाळपर्यंत अजून 1 हजार 200 जणांना बाहेर काढलं जाईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. पिंपरीमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

कर्नाटकसरकार बरोबर चर्चा सुरु आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक्सनं पाणी सोडावं अशी विनंती केली आहे. मात्र अजून पाणी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहचलं आहे. त्याची माहिती अलमट्टीपर्यंत दिल्याचं पाटील म्हणाले. त्यासोबतच कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, सांगलीमधील कृष्णा आणि वारणा या नद्यांना पूर आल्यामुळे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यासोबतच 25 ठिकाणचे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. यामधील 8 राज्यमार्गांचा समावेश आहे.शिराळा, पलूस, मिरज आणि वाळवा या तालुक्यातील रस्ते बुडालेले आहेत. त्यामुळे रस्त्यांची वाह़तूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

‘राजने नव्या अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरलासुद्धा…’; पॉर्नोग्राफी केसमध्ये गहनाचा धक्कादायक खुलासा!

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

मोठी बातमी! शाळेच्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्रात पावसाचं रौद्र रुप! वरंध्याच्या घाटात गेल्या 24 तासांत 30 ठिकाणी दरडी कोसळल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More